गेली 35 वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत
समाजातील वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
व्यसनासक्त व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांसाठी मुक्तांगण व कृपा फाऊंडेशन या संस्थामार्फत समुपदेशनाची सेवा
कथाकथन या विषयाचा सखोल अभ्यास व या माध्यमाची शिक्षणात असणारी उपयोगिता यावर विपुल लेखन
शिक्षक, पालक यांसाठी कार्यशाळा
उत्तम लेखिका, पाश्चात्त्य वाड्मयावर लेखमाला.
प्रकाशित पुस्तके
डिफीकल्ट डॉटर्स – मराठीत भाषांतरीत केले आहे.
आमचा काय गुन्हा – विखे पाटील पुरस्काराने सन्मानित
निशब्द झुंज – 2007 उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार- महाराष्ट्र शासन
गोष्टी जन्मांतरीच्या
अफलातून गोष्टी
हरवले ते गवसले
मालक नको पालक व्हा
मुंबईतील चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या ‘डेव्हीड ससून इंडस्ट्रीयल स्कूल ‘ या उन्मार्गी मुलांसाठी विविधांगी मूलभूत काम. यातून ‘आम्ही युवा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना.
पुण्यातील वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास या संस्थेची स्थापना.
पुरस्कार
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टाइम्स ग्रुपचा ‘देवी पुरस्कार’ 2017
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ग्रामदेवता पुरस्कार 2018
‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार 2018’ ने सन्मानित.
महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी पुरस्कार
मुंबई दूरदर्शनतर्फे ‘हिरकणी पुरस्कार’
विद्या सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा ‘विद्या व्यास पुरस्कार’ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानित